कडबोळी

साहित्य - भाजणी - दोन फुलपात्री (पाणी पिण्याचे भांड)भरून, २ चमचे तीळ, २ छोटे चमचे तिखट २ छोटे चमचे मीठ, १ छोटा चमचा ओवा, ४ मोठे चमचे मोहन (कडकडीत तेल), तळण्याकरता तेल.

Updated: Oct 22, 2012, 08:42 PM IST

www.24taas.com, मुबंई

साहित्य –
थालीपीठ भाजणी - दोन फुलपात्री (पाणी पिण्याचे भांड)भरून, २ चमचे तीळ, २ छोटे चमचे तिखट
२ छोटे चमचे मीठ, १ छोटा चमचा ओवा, ४ मोठे चमचे मोहन (कडकडीत तेल), तळण्याकरता तेल.
कृती –
एका पसरट भांड्यात भाजणी, तीळ, ओवा, तिखट, मीठ व मोहन घ्यावे . सारे पदार्थ नीट एकत्र करून घ्यावेत. त्याच मिश्रणात एक फुलपात्र भरून उकळलेले पाणी एकत्र करावे. मिश्रण झाकून ठेवावे.
एका तासाने भाजणी हाताने व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करावा. थोड्या पिठाचा गोळा करून तो पोळपाटावर घेऊन हातानेच त्याची सुरनळी करावी. (वातीप्रमाणे लांब करावे.) ही सुरनळी बारीक असावी, म्हणजे तळताना आतून कच्ची राहणार नाही. आता ही कडबोळी मंद आंचेवर गॅस ठेवून तळून घ्यावीत. मोठ्या गॅसवर तळल्यास मऊ होण्याची शक्यता असते.