गोड खाजा

Last Updated: Monday, October 22, 2012 - 20:37

www.24taas.com,मुबंई
साहित्य -
१-१/२ वाटी मैदा, १/२ वाटी गूळ, १ वाटी पाणी, १/४ चमचा वेलची पूड, १ चमचा तूप
कृती -
पहिल्यांदा गूळ पाण्यात विरघळेपर्यत गरम करत राहा. नंतर गूळाचे पाणी गाळून घ्या आणि थंड करून त्यात वेलची पूड टाका. मैद्यामध्ये तूप घाला. यानंतर गूळाच्या पाण्याने मैद्याचे पीठ मळून घ्या. पीठ मळल्यानंतर त्याचे २४ ते २५ भाग करा, परत मळा, आणि त्याचे ४ इंच मापाचे गोळे करा. तयार केलेल्या गोळ्यांना चपटा आकार द्या. केलेले गोळे कोरडे होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. थोड्या वेळाने केलेले गोळे पिवळसर रंग येईपर्यत तूपात तळून घ्या. टिश्यू पेपर तळलेले खाजा थंड होण्यासाठी ठेवून द्या. थोड्या वेळानंतर कुरकुरीत खाजांचा आस्वाद घ्या आणि तयार केलेला खाजा घट्ट बरणीत ठेवा.

First Published: Monday, October 22, 2012 - 19:12
comments powered by Disqus