सचिनची निवृत्ती, अन् पूनम पांडेचं भांडवल

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, November 15, 2013 - 18:14

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नेहमी आपल्या विचित्र वक्तव्य, विचित्र फोटो यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने पुन्हा सचिनच्या निवृत्तीचं भांडवल केलं आहं. पूनम पांडेने आपल्या हातावर सचिनचा टॅटू काढून घेतला आहे. तिने हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यापूर्वीही तिने विश्वचषकाच्या वेळी भारत जिंकला तर स्टेडियममध्ये विवस्त्र होण्याची तयारी दाखवली होती. तेव्हापासूनच पूनप पांडे चर्चेत आली होती.
प्रसंग कोणताही असो... चर्चेत राहणार मी... असं पूनम पांडेने ठरवून घेतलं दिसतं. सचिन तेंडुलकरला वानखेडे स्टेडियममध्ये खेळताना सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित राहणार असल्याचा ट्वीटही तिने केला होता.

त्यानंतर तिने तीन फोटो आपल्या ट्विटरवर अपलोड केले आहे. त्यात सचिनचा टॅटू काढताना.... क्रिकेट खेळताना आणि वानखेडेला कमी कपड्यात जातानाचे फोटो पोस्ट केले आहे.

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Friday, November 15, 2013 - 18:08


comments powered by Disqus