एका सुवर्ण युगाची अखेर-पवार

‘एका सुवर्ण युगाची अखेर-पवार’ अशा शब्दात गुरुवारी भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सचिन तेंडुलकरच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

Updated: Oct 11, 2013, 05:18 PM IST

www.24taas.com , झी मीडिया नवी दिल्ली
‘एका सुवर्ण युगाची अखेर’ अशा शब्दात गुरुवारी भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सचिन तेंडुलकरच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलेली आहे.
"कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या सचिन तेंडुलकरची कारकीर्द ही अनेक माईलस्टोन आणि विक्रमांनी सजलेली आहे. माजी आयसीसी अध्यक्ष पवार पुढे म्हणाले की, पुढे येणाऱ्या सर्व खेळाडूंना सचिन तेंडुलकरची कारकीर्द प्रेरणादायी ठरेल. खेळ त्याची भक्ती, प्रेम आणि उत्साह होती. त्याच्या कृतीमागची प्रेरकशक्ती होती. सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून प्रचंड चाहते असलेला तो एकमेव खेळाडू आहे.
सचिन सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडू असून तो भारतीय क्रिकेटसोबत कोणत्या ना रूपात तो जोडलेला राहील अशी मला आशा आहे, असे सांगून पवार यांनी सचिनला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पीटीआय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.