कोमसाप संमलेनात कवितांचा बहर

By Surendra Gangan | Last Updated: Sunday, December 9, 2012 - 16:14

www.24taas.com, श्री. ना. पेंडसे साहित्यनगरी, दापोली
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १४ व्या संमेलनाला वादविवादानंतर सुरूवात झाली. अनेक रसिकांनी या संमेलनाला उपस्थिती लावून संमेलनाची रंगत वाढवली. यावेळी, कवी अशोक नायगावकर,अरूण म्हात्रे आणि सौमित्र यांनी आपपल्या शैलीत कवितांचं वाचन करून कार्यक्रमात रंग भरले.
उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर यांनी आपल्या नेहमीच्याच मिश्किल शैलीत राज्यात घोटाळे होत असताना निसर्ग घोटाळा करतोय याची केलेली अचूक मांडणी रसिकांना भावली.
नायगावकरांनी सादर केलेल्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. अरूण म्हात्रे यांनी उंच माझा झोका या मालिकेचं शीर्षक गीत सादर करताच. रसिकांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. तसंच,गारवा फेम सौमित्र यांनी आपल्या खास अशा शैलीतून सादर केलेल्या कवितेला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली.
दरम्यान, दापोलीत कोकण मराठी साहित्य संमेलनालाही उत्साहात सुरुवात झाली. कवी अशोक नायगावकर संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. ग्रंथदिंडीमध्ये दापोलीकरांसह परिसरातून अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. संमेलनात साहित्यीप्रेमींसाठी विविध दालनं उभारण्यात आलीत.



First Published: Sunday, December 9, 2012 - 13:57


comments powered by Disqus