जाहले संमेलनाचे उद्घाटन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

मराठी मनाचा वेध घेणाऱ्या या गाण्याने मराठी साहित्य संमेलनाचे चिपळुणमध्ये उत्साहात उद्घाटन झाले.

Updated: Jan 11, 2013, 05:34 PM IST

www.24taas.com, चिपळुण
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठी मनाचा वेध घेणाऱ्या या गाण्याने मराठी साहित्य संमेलनाचे चिपळुणमध्ये उत्साहात उद्घाटन झाले. अनेक मान्यवरांची उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. साहित्यिकांना खाशी साहित्यिक मेजवानी असल्याने अनेक साहित्यिकांनी साहित्यनगरीत हजेरी लावली आहे.
साहित्य संमेलनाचा उत्साह चिपळुणात ओसंडून वाहतोय.. यातच चिपळुणकरांनी एक वेगळा अनुभव घेतला.. सर्व चिपळूणकर भारावून गेले. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले आहे.

याप्रसंगी संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मावळते अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याआधी सकाळी साडेआठ ते साडेदहा या कालावधीत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.