बॉलिवूड म्हणतं `संजय दत्त गुन्हेगार नाही!`

संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. ट्विटरवर बॉलिवूडने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 21, 2013, 03:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेता संजय दत्त याला १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विना परवाना शस्त्रास्त्रं बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वीही संजय दत्तला याच प्रकरणी १८ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. पुहा संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे. ट्विटरवर बॉलिवूडने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दिग्दर्शक महेश भट्ट- संजय दत्तला पाच वर्षं शिक्षा झाल्याचं ऐकून खूप दुःख झालं. त्याला माफ करतील, असं मला वाटलं होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही.
संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी- संजय दत्त मला माझ्या मोठ्या भावासारखाच आहे. माझा नेहमीच त्याला पाठिंबा राहिला आहे. तसाच तो यापुढेही राहील. त्याने पूर्वी केलेल्या चुकांची त्याला गरजेपेक्षा जास्त शिक्षा भोगाली लागत आहे. इतके वर्षं त्याला जो मानसिक त्रास झाला, तीच शिक्षा खूप मोठी आहे.
निर्माता दिग्दर्शक करण जोहर- संजय दत्तला शिक्षा झाली हे ऐकून मी कोसळून गेलो. मी ओळखत असलेल्या काही सर्वोत्तम माणसांपैकी तो एक आहे. एवढ्या चांगल्या माणसाला अशी शिक्षा योग्य नाही.
अर्शद वारसी- काय मत व्यक्त करावं, हेच सुचत नाही. संजय दत्तला झालेली शिक्षा ऐकून मी खूप निराश झालोय. संजय दत्त गुन्हेगार नाही. त्याने केलेल्या गुन्ह्याच्या मानाने मिळालेली शिक्षा खूर कठोर आहे.

अभिनेत्री पूनम धिल्लों- संजू, तुझ्या शिक्षेबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटतं. तू खूप चांगला माणूस आहे. तुझ्या सर्व शिक्षा आणि सर्व संकटं लवकरात लवकर संपावीत अशी मी प्रार्थना करते.
बिपाशा बासू- संजय दत्तच्या शिक्षेबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. त्याचं दुःख मी समजू शकते. या परीक्षेच्या काळात देव त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शक्ती देवो.