संजय दत्तनं टाडा कोर्टासमोर पत्करली शरणागती!

टाडा कोर्टासमोर हजर होण्यासाठी संजय दत्त घराबाहेर पडलाय. कोर्टानं शरणागतीसाठी दिलेली मुदत थोड्याच वेळात संपणार आहे. बाहेर पडताना त्यानं उसनं अवसान आणून आपल्या चाहत्यांना एक छोटंसं आढून ताणून आणलेलं ‘स्मितहास्य’ दिलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2013, 03:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संजय दत्त टाडा कोर्टासमोर हजर झालाय. त्याला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात येईल याचा निर्णय कोर्ट घेणार आहे.
कोर्टाच्या आवारात पोहचल्यानंतर संजय दत्तला घोळक्याला सामोरं जावं लागलं. तीन वेळा गाडीतून उतरून गर्दीमुळे तो परत गाडीत जाऊन बसला. प्रचंड गराड्यामुळे त्याला पाऊलही पुढे टाकणं कठिण झालं होतं. संजयच्या वतीनं यावेळ ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट पुढे सरसावले. त्यांनी हात जोडून सगळ्यांना संजयला वाट देण्याची विनंतीही केली. त्यानंतर अखेर काही वेळानं मीडियाच्या गराड्यातून वाट काढत संजय दत्त कोर्टासमोर दाखल झाला.
टाडा कोर्टासमोर हजर होण्यासाठी संजय दत्त घराबाहेर पडला. कोर्टानं शरणागतीसाठी दिलेली मुदत चार वाजता संपणार होती. बाहेर पडताना त्यानं उसनं अवसान आणून आपल्या चाहत्यांना एक छोटंसं आढून ताणून आणलेलं ‘स्मितहास्य’ दिलं.
आज दुपारी चारच्या अगोदर संजयला टाडा कोर्टासमोर हजर व्हायचंय. संजयच्या बांद्रा इथल्या ‘इम्पेरिअल हाईटस् बिल्डिंग’बाहेर आज सकाळपासूनच लोकांनी आणि मीडियानं गर्दी केलीय.
पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केलेला ५३ वर्षीय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याची पत्नी मान्यता, बहिण प्रिया दत्त आणि आणखी काही जवळच्या मित्रपरिवारासोबत घराबाहेर पडला. आर्थर रोड जेलच्या दिशेने निघताना त्याच्यासोबत महेश भट्ट आणि अपूर्व लाखियाही त्याच्यासोबत होते. बांद्रा-वरळी सीलिंकमार्गे तो उत्तर मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये पोहचणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.