संजय दत्त कोर्टातच शरण जाणार

अभिनेता संजय दत्तनं येरव़डा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं उद्या संजय दत्तला टाडा कोर्टासमोरच शरण यावं लागणार आहे.

Updated: May 15, 2013, 12:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता संजय दत्तनं येरव़डा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं उद्या संजय दत्तला टाडा कोर्टासमोरच शरण यावं लागणार आहे.
संजय दत्तनं केलेल्या विनंती अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संजय दत्तला दिलेली शरणागतीची मुदत उद्या संपतेय. त्यामुळं संजय दत्तला उद्यापर्यंत शरण यावं लागणार आहे.
संजय टाडा कोर्टासमोर शरण आल्यास त्याला कोणत्या जेलमध्ये पाठवणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये. संजय दत्तला मुंबईतला आर्थररोड जेल, नवी मुंबईतील तळोजा, ठाणे, नाशिक आणि पुण्यातील येरवडा जेलमध्ये पाठवण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.