संजयचा ‘सरेंडर प्लान’

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, May 16, 2013 - 09:42

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सगळ्या आशा संपल्या, प्रयत्न संपले... जेलमध्ये जाण्याशिवाय संजूबाबासमोर दुसरा पर्यायच नव्हता. शरणागतीचं काऊंटडाऊन सुरू झालंय. आता शरणागतीसाठी संजूबाबाचा सरेंडर प्लान तयार आहे. मुंबईच्या पाली हिल इथल्या त्याच्या घरापासून येरवडा जेलपर्यंतचा प्लान कसा असेल… पाहुयात...
पाली हिल
पाली हिल जिथे संजय दत्तचं घर आहे, तोच संजयच्या सरेंडर प्लानचा पहिला स्पॉट, टाडा कोर्टात शरण येण्यासाठी संजय दत्त घरातून निघेल. संजयच्या घरापासून टाडा कोर्टात जाण्यासाठी साधारण तासभर लागेल.
टाडा कोर्ट
टाडा कोर्टात संजयला शरण यायचंय. टाडा कोर्टातच काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. त्या कामासाठी अर्ध्या ते एक तासाचा वेळ लागेल. टाडा कोर्टातच संजय दत्तला ताब्यात घेण्यात येईल. पोलिसांच्या सुरक्षेत संजयला टाडा कोर्टातून आर्थर रोड जेलमध्ये नेलं जाईल. टाडा कोर्टातून आर्थर रोडला जाण्यासाठी साधारण अर्धा ते एक तास लागेल.
आर्थर रोड जेल
आर्थर रोड जेलमध्ये पोहोचल्यावर संजयला आर्थर रोड जेलच्या कर्मचाऱ्यांच्या हवाली केलं जाईल. संजयच्या शरणागतीसंदर्भात काही कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर होणाऱ्या निर्णयाप्रमाणे संजयला पुण्यातल्या येरवडा जेलकडे नेण्यात येईल.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे
आर्थर रोड जेल ते पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पोहोचेपर्यंत तीन ते चार तास लागतील. येरवड्याच्या जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण खबरदारी घेण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013 - 09:42
comments powered by Disqus