तनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, November 10, 2013 - 13:50

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्याच्या ‘बिग बॉस ७’ सिझनमध्ये आपल्या नामवंत कुटुंबाच्या जोरावर जेव्हा तनीषा दाखल झाली, तेव्हा सरव्नाच आश्चर्य वाटलं होतं. गेल्या जमान्यातील प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.
अभिनेत्री म्हणून अपयशी ठरलेल्या तनीषाने जेव्हा बिग बॉसमध्ये एंट्री केली, तेव्हापासूनच तिच्या या निर्णयावर कुटुंब नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र तनीषा बिग बॉसच्या घरात आल्यावर ज्या प्रकारे वागायला लागली, त्यानंतर तिच्या कुटुंबानेच तनीषाला शोमधून बाहेर काढण्याची विनंती चॅनलकडे केली असल्याची चर्चा होती. मात्र, दिवाळीमध्ये जेव्हा बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबाकडून दिवाळीच्या भेटवस्तू मिळाल्या, तेव्हा केवळ तनीषाला तिच्या कुटुंबाकडून कुठलीही भेटवस्तू मिळाली नाही. याबद्दल कॅमेरांसमोर तनीषाने खंत व्यक्त केली नसली, तरी तिच्या बिग बॉसच्या घरात येण्यामुळे कुटुंबात निर्माण झालेला बेबनाव उघडकीस आला.
याविषयी बिग बॉस कार्यक्रमातील एका क्रू मेंबरने माहिती दिली, की तनुजा, काजोल यांनी दिवाळीत तनीषाला बिग बॉसच्या घरात भेटवस्तू पाठवावी, असं चॅनलने सांगितलं होतं. मात्र तनीषाच्या कुटुंबाने कुठलीही भेटवस्तू पाठवली नाही. याउलट, कजोलच्या प्रवक्त्याने मात्र काजोलला भेटवस्तूसंदर्भात कुठलाही निरोप मिळाला नसल्याचं म्हटलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 10, 2013 - 13:50
comments powered by Disqus