सलमान म्हणतो, शाहरुख माझा `मित्र`!

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, November 18, 2013 - 11:02

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘दबंग’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूख यांच्या चाहत्यांना एक आश्चर्यचकित करणारा पण गोड धक्का बसला.
‘गोरी तेरे प्यार मे’ या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी इमरान खान आणि करीना कपूर हे दोघं, रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस’च्या सेटवर दाखल झाले होते. बिग बॉसच्या सेटवर प्रमोशनसाठी येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटींशी सलमान मस्ती-मस्करी करत असतो, हे आपल्यासाठी काही नवीन नाही. पण करीना-इमरानशी गप्पा मारताना सलमाननं चक्क शाहरुखचा उल्लेख आपला ‘मित्र’ म्हणून केला.
‘गोरी तेरे प्यार मे’, या सिनेमात इमरान खान एका दक्षिणात्य युवकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावरून इमरानने सलमानला विचारलं की ‘तू असा एखादा सिनेमा केलाय का... ज्यात तुम्ही दाक्षिणात्य युवकाची भूमिका केली आहे’. या प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘मी असा रोल केला नाही, परंतु माझ्या मित्रानं-शाहरुखनं मात्र ‘रा-वन’ या सिनेमात दाक्षिणात्य युवकाची भूमिका केलीय’.
सलमानच्या तोंडून शाहरुखसाठी ‘मित्र’ हा शब्द ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच नव्हे तर समोर बसलेल्या प्रेक्षकांना आणि इमरान-करीनालाही हा धक्का जरा जास्तच जोरात लागला.

यावर्षी झालेल्या बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत शाहरूख खान आणि सलमान खान यांनी एकमेकांना मिठी मारली होती. त्या दोघांना पुन्हा एकत्र बघून सर्व समिकरण बदलली आणि त्यांचे चाहतेही खूश झालेले दिसले होते. आता, लवकरच या दोघांना पुन्हा एकत्र पाहता येईल, असं आशा त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झालीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013 - 11:02
comments powered by Disqus