... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!

Last Updated: Tuesday, December 10, 2013 - 14:08

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.
त्यांनी यावेळी ‘हम आपके हे कौन’ मधल्या ‘दीदी तेरा देवर दिवाना...’ या गाण्यावर सलमान आणि माधुरीनं प्रेक्षकांसाठी डान्स ही केला. त्यावेळी सर्व दर्शक भारावून गेले होते. माधुरी दिक्षीत गुलाबी रंगाच्या साडीत खूपच दिलखुश दिसत होती.
माधुरी आणि सलमान हे दोन्ही स्टार १९९४साली पहिल्यांदाच ‘हम आपके हे कौन’ या चित्रपटातून दर्शकाच्या भेटीला आले होते. त्यावेळी प्रेक्षकांनी या जोडीला भरपूर पसंती मिळाली. प्रेमळ आणि सोज्वळ दिसणारी ही जोडी चित्रपटात हिट झाली होती. प्रेक्षकांना तर सलमान आणि माधुरीची ही जोडी एवढी आवडली की त्यांनी रिअल लाईफमध्येही त्यांनी लग्न करावं असं प्रेक्षकांना वाटू लागलं होतं.
परंतु असं घडलं नाही कारण की रिअल लाईफमध्ये माधुरी ही फार व्यस्त असायची. त्यामुळं माधुरी ही सलमानच्या जाळ्यात फसली नाही आणि मिस्टर नेने यांची पत्नी झाली. परंतु सलमान खाननं माधुरीला पटवण्यासाठी फार प्रयत्न केले, ही गोष्ट स्वत: सलमाननं ‘बीग बॉस ७’च्या सेटवर माधुरीला सांगितली.
‘बीग बॉस ७’च्या सेटवर माधुरीनं दमदार एंट्री केली. यावेळी तिच्या सोबत हुमा कुरेशी ही नजरेत आल्या. हा चित्रपट फेब्रुवारी २०१४मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल भारद्वाज निर्मित बनवण्यात आलेला चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्किया’चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केलंय. या चित्रपटात माधुरी दीक्षित, नासिरूद्दीन शाह, हुमा कुरैशी आणि अरशद वारसी हे लीड रोलवर दिसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओFirst Published: Tuesday, December 10, 2013 - 14:05


comments powered by Disqus