शुभमंगल सावधान! श्री-जान्हवीचं खराखुरं लग्न लागलं

By Aparna Deshpande | Last Updated: Saturday, February 8, 2014 - 12:22

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आपल्या सर्वांचे लाडके श्री-जान्हवी आज खरेखुरे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचा विवाह आज पुण्यात संपन्न होतोय. सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत तेजश्री केतकरांच्या घरची खरीखुरी सून झालीय.
`होणार सून मी... ` या मालिकेद्वारे ही जोडी सुपरहिट ठरलीय आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. हिंदीतल्या तारे-तारकांप्रमाणंच या मराठी कलाकारांची क्रेझही आता जबरदस्त वाढलीय. त्यामुळं यांच्या लग्नाची बातमी येताच सगळ्यात जास्त आनंद हा प्रेक्षकांना झाला होता.
प्रेक्षक या जोडीला भेटण्यासाठी खूप आतुर असतात. त्यामुळं त्यांच्या लग्नाला प्रेक्षकांची खूप गर्दी होणार असं दिसत होतं. त्यामुळं गर्दी टाळण्यासाठी लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रवेशिकांची अट घातली होती. त्यामुळं आज विशेष उपस्थितांच्या साक्षीनं `श्री-जान्हवी`चा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीनं पार पडला. मात्र तरीही या विवाहाला मराठमोळा आणि `सिरियल टच` नक्कीच होता.
पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, February 8, 2014 - 11:56


comments powered by Disqus