बीग बॉस : तनिषा मुखर्जीला जोरदार धक्का!

टीव्ही रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’ची आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झालीय. त्याचाच परिणाम म्हणून या कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक घडामोडी आणि अनेक रंजक किस्से घडताना दिसून येत आहेत.

शुभांगी पालवे | Updated: Dec 1, 2013, 03:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीव्ही रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’ची आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल सुरू झालीय. त्याचाच परिणाम म्हणून या कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक घडामोडी आणि अनेक रंजक किस्से घडताना दिसून येत आहेत. या शनिवारी प्रसारित करण्यात आलेल्या भागात तनिषा मुखर्जीला चांगलाच धक्का बसलाय... पण, तनिषाला बसलेला हा धक्का तिच्या घरच्यांसाठी थोडा दिलासादायकच असेल.
नेहमी, एका आठवड्यात एक सदस्य घरातून बाहेर पडणार... हा या शोचा फॉरमॅट... या शनिवारी या घरातून एक सदस्य घरातून बाहेर पडला... पण, तो या कार्यक्रमातून मात्र अजूनही बाहेर पडलेला नाही. हा सदस्य म्हणजे, अरमान कोहली... अरमानचं ‘फेक एव्हिक्शन’ करण्यात आलं. त्यामुळे अरमानला तनिषाला आणि इतर सदस्यांना सोडून घराच्या दरवाजातून बाहेर पडावं लागलं. पण, तो घरी गेलेला नाही. तर त्याला फक्त एका सीक्रिट रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं. परंतु, याची भनक अन्य कोणत्याही सदस्यांना नाही. पण, अरमानच्या जाण्यामुळे तनिषाला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. अरमानला रोखताना तीही घरातून बाहेर पडण्यास तयार झाली होती. पण, अरमाननंच तिला रोखलं.
काही दिवसांपासून तनिषाच्या कुटुंबीयांमध्ये तनिषा आणि अरमानच्या वाढत्या जवळकीची चिंता वाढली होती. तनिषाची बहिण काजोल आणि अजय देवगण यांनी यासंबंधी सलमानला फोनही केला होता. अजयनं तर या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम न करण्याचीही धमकी दिल्याचं वृत्त आहे. त्यानंतर निर्मात्यांनी हा मध्यस्थीचा मार्ग स्वीकारल्याचं म्हटलं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.