Assembly Election Results 2017

एली अवराम आणि सलमान खान यांची जोडी जमेल का?

बिग बॉस ७ मध्ये ग्रीक-स्वीडिश इथली अभिनेत्री ‘एली अवराम’ ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या एली अवराम ही अभिनेत्री फार चर्चेत आहे. कारण तिचं नाव आता सलमान खानशी जोडलं जात आहे. सध्या ती सलमानच्या खास मित्रांच्या यादीत सहभागी झाली आहे.

Updated: Nov 30, 2013, 05:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बॉस ७ मध्ये ग्रीक-स्वीडिश इथली अभिनेत्री ‘एली अवराम’ ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या एली अवराम ही अभिनेत्री फार चर्चेत आहे. कारण तिचं नाव आता सलमान खानशी जोडलं जात आहे. सध्या ती सलमानच्या खास मित्रांच्या यादीत सहभागी झाली आहे.
एली बिग बॉसच्या घरात असताना सलमान खाननं तिच्याशी बोलायची एक ही संधी सोडली नाही आणि सलमान एलीला सारखा बोलायचा की एली तू कतरिना कैफ सारखी दिसतेस. त्यावेळी सलमानचं बोलणं ऐकून एली गालातल्या गालात हसत होती आणि नंतर सलमानसाठी ती हिंदीतलं गाणंही म्हणायची... ते गाणं ऐकून सलमानला लाज वाटायची. शो सुरू असताना सलमान बोलता बोलता एलीची भरपूर फिरकी घ्यायचा परंतु एली त्याला प्रत्युत्तर देत नव्हती. याचाच अर्थ म्हणजे सलमानच्या मनात एली विषयी प्रेम भावना जाणवत आहे. एलीला ही सलमान बरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं स्वत: एलीनंच बोलून दाखवली होती.
यंदा सलमान खान हा डिसेंबर महिन्यात ४८ वर्षांचा होणार आहे. तसंच तो देशातील महत्त्वाचा ‘इलिजबल बॅचलर मॅन’ म्हणून ओळखला जातो. सलमानच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, एली आणि सलमान खानची जोडी ही शोभून दिसते. त्याचा खास मित्र आमिर खाननंही मागं म्हटलं होतं, की सलमानला मी लवकरात लवकर लग्नाच्या बंधनात अडकलेला बघू इच्छितो अशा वेळी हे बघणं फार मजेशिर ठरणार आहे की, एली सलमानची लाईफ पार्टनर बनणार का? हे फक्त येणारी वेळच सांगू शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.