`कॉमेडी नाइट्स...`मधून ‘गुत्थी’ गायब होणार

‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये गुदगुल्या करून किंवा खळखळून हसवणारी ‘गुत्थी’ लवकरच या कार्यक्रमातून गायब होणार आहे.

शुभांगी पालवे | Updated: Nov 12, 2013, 12:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये गुदगुल्या करून किंवा खळखळून हसवणारी ‘गुत्थी’ लवकरच या कार्यक्रमातून गायब होणार आहे. ‘गुत्थी’चं पात्र लोकप्रिय करणारा अभिनेता आणि हास्य कलाकार सुनील ग्रोवर छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाला ‘गुड-बाय’ म्हणण्याच्या तयारीत आहे.
कलर्सवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे निर्माता आणि प्रस्तुतकर्ता कपिल शर्माचा हास्यपूर्ण हजरजबाबीपणा तर लोकांना भावला पण सोबतच या कार्यक्रमातील दादी, बुआ, पलक आणि गुत्थी हे इतर पात्रही चांगलेच लोकप्रिय ठरले.
गुत्थीचे हावभाव आणि गाणी तर आता तिची ओळखच बनलेत. चेहऱ्यावरची माशीही उडू न देणाऱ्यांनाही या टीमनं पोट धरून हसायला लावलं. पण, या टीममधल्या ‘गुत्थी’चं पात्र लोकप्रिय करणाऱ्या सुनील ग्रोवरनं हा कार्यक्रम सोडलाय.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आपण निभावलेलं ‘गुत्थी’चं पात्र लोकांनी मोठ्या आनंदानं स्वीकारलंय आणि भरभरून प्रेमही दिलंय... त्यामुळे सुनील खूश आहे. परंतु, आपल्या काही अगोदर कबूल केलेल्या जबाबदाऱ्यांमुळे तो या कार्यक्रमाचा यापुढे भाग राहणार नाही. तसंच पुन्हा या कार्यक्रमात परतण्याच्या शक्यताही कमीच आहेत.
पण, सुनील ग्रोवरनं या कार्यक्रमासाठी दिल्या जाणारं मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती. पण, निर्मात्यांनी मात्र ही मागणी मान्य केली नाही... त्यामुळे त्यानं कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय... अशी चर्चाही सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.