मेहुणीच्या कृत्यांमुळं ‘सिंघम’ खवळला!

Last Updated: Sunday, December 1, 2013 - 13:51

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी असलेल्या तनिषा मुखर्जीच्या कुटुंबातील सर्व सदस्य तनिषावर रागावले आहेत. तनिषाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटते की, तनिषानं लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर यावं.
कुटुंबाबरोबरच तनिषाचे ‘भावोजी’ म्हणजेच अजय देवगण हे देखील आपल्या 'साली'च्या वागणुकीमुळं तिच्यावर रागवले आहेत. त्यामुळं त्यांनी या कार्यक्रमाच्या व्हायकॉमच्या निर्मात्यांना आपली साली म्हणजेच तनिषाला या कार्यक्रमातून काढण्यास सांगितलंय.
तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण करणाऱ्या कंपनीच्या निर्मात्यांनाही अजयनं सक्त ताकिद दिली आहे. भविष्यात माझ्याबरोबर काम करायचं असेल तर तनिषाला लवकरात लवकर या शोमधून बाहेर काढा. अजयनं खडसावल्यानंतर निर्मितीमधील अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत बिग बॉस हे त्यांच्या निर्णयावरुन कोणतंही योग्य कारण सांगून शोमधल्या कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेर काढता येतं का?, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेल्या तनिषा आणि अरमानची जवळीक तनिषाची बहिण काजोल आणि तिच्या आईला म्हणजेच तनुजाला आवडत नव्हती. त्यामुळं दोघांनी ही मिळून अजय देवगणला त्याचा खास मित्र आणि बिग बॉसचा ‘बॉस’ सलमान खान याला फोन करुन तनिषाला बाहेर काढण्यास सांगितलं. परंतु तनिषाला बाहेर काढण्यास सलमान खानला ही अपयश आलं. त्याचबरोबर या आठवड्यात एलिमिनेशन रद्द करण्यात आल्यामुळं तनिषाला शो मधून काढणं शक्य नाही तर अशक्य आहे. त्यामुळं अजयचा संताप खूप वाढलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, November 30, 2013 - 19:36


comments powered by Disqus