कपिलचा उत्साह कायम; प्रेक्षकांचे मानले आभार

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, September 27, 2013 - 10:23

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’चा होस्ट कपिल शर्मा यानं चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानलेत. आपण हा शो घेऊन लवकरच परतणार आणि लोकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करणार असा विश्वास कपिलनं व्यक्त केलाय.
बुधवारी, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये लागलेल्या आगीत ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’चा संपूर्ण सेट जळून खाक झाला होता. दैव बलवत्तर म्हणून इथं काही जीवितहानी झाली नाही. पण, संपूर्ण सेट मात्र उद्ध्वस्त झाला. यानंतर लोकांनी व्यक्त केलेल्या प्रेम आणि स्नेहानं कपिल भावूक झाला होता.
‘कामेडी नाइट्स विद कपिल’च्या सेटवर अशी दुर्भाग्यपूर्ण घटना घटली परंतू यात कुठलीही जिवितहानी झालेली नाही आणि या आगीत किती नुकसान झालं, याचा अंदाजा घेत आहोत, असं चॅनलच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. ‘आम्ही कार्यक्रमाचं थांबलेलं शूटींग पुन्हा कसं सुरू करता येईल याकडे लक्ष देत आहोत. कार्यक्रमात व्यत्यय येऊन प्रेक्षक निराश होऊ नयेत, असे आमचे प्रयत्न असतील.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या सेटच्या जवळच ‘रॅम्बो राजकुमार’ची शूटींग करत होती. तिनंच ट्विट करून ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहचवली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 26, 2013 - 13:14
comments powered by Disqus