इथं गर्लफ्रेंड सांभाळता येत नाही, तिथं?- सलमान खानNo girlfriend then what to do marriage- Salman

इथं गर्लफ्रेंड सांभाळता येत नाही, तिथं?- सलमान खान

इथं गर्लफ्रेंड सांभाळता येत नाही, तिथं?- सलमान खान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार मे’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. करीना आणि इमरान काही काळासाठी बिग बॉसच्या घरात देखील जाऊन आले. तिथं त्यांनी स्पर्धकांशी भेट घेतली, गप्पा मारल्या. यानंतर इमरान-करीना ‘बिग बॉसच्या’ सेटवर सलमानसह उपस्थित झाले.

सलमान, प्रमोशनसाठी येणाऱ्या सर्व सेलिब्रिटींची मजबूत मस्करी करतो. करीनाशी ही सलमाननं भरपूर मस्ती केली. यादरम्यान करीनानं ही सलमानला विचारलं, ‘तुम्ही कधी लग्न करणार?’ आपल्या सर्वांनाच माहीत आहे, सलमान लग्नाचा विषय निघाला असता दुर्लक्ष करतो. मात्र करीनाच्या या प्रश्नावर सलमान हसला.
आणि उत्तर दिलं, ‘ इथं गर्लफ्रेन्ड सांभाळनं मुश्किल आहे, तर लग्न कसं करू? सलमानचं हे उत्तर ऐकताच करीना आणि इमरानलाही हसणं आवरता आलं नाही.

करण जोहर निर्मित आणि पुनित मल्होत्रा दिग्दर्शित ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमात इमरान खान, करीना कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिका करणार आहेत. या सिनेमात ईशा गुप्ता एक आयटम नंबर करताना दिसणार आहे. निर्माता करण जोहरनं सांगितलं, या सिनेमाची कहाणी ही दिग्दर्शित पुनित मल्होत्राच्या वास्तविक अनुभवांवर आधारित आहे. इमरान खान आणि करीना कपूर अभिनीत या सिनेमात, शहरातील एका युवकाची, आपल्या प्रेयसीला पटवण्यासाठी केली जाणारी धडपड आणि शहर ते गावापर्यंत केलेल्या प्रवासाची ही कहाणी आहे. हा सिनेमा २२ नोव्हेंबरपासून सिनेमाघरात पाहायला मिळणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 19:08


comments powered by Disqus