प्रत्युषा झाली बिग-बॉसच्या घरातून बाहेर...

कलर्सवर ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेतील ‘बहू’चं – आनंदीचं पात्र साकारणारी प्रत्युषा बॅनर्जी ही अखेर रिअॅलिटी शो ‘बीग बॉस - सीझन ७’मधून बाहेर पडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2013, 03:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कलर्सवर ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेतील ‘बहू’चं – आनंदीचं पात्र साकारणारी प्रत्युषा बॅनर्जी ही अखेर रिअॅलिटी शो ‘बीग बॉस - सीझन ७’मधून बाहेर पडलीय.
गेल्या शुक्रवारी, बीग बॉसमधून बाहेर पडणारी प्रत्युषा ही अकरावी सदस्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बीग बॉसच्या घरात राहणाऱ्या प्रत्युषाला बाहेर पडल्यानंतर मात्र घरातील आपल्याबरोबर असलेल्या स्पर्धकांची खूप आठवण येतेय. त्यांच्यासोबत आपण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घालवले असल्याचं तीनं बाहेर पडल्यानंतर म्हटलंय.
‘मला आता बीग बॉसच्या घराची खूप आठवण येतेय. कारण मला आता त्या सगळ्यांची सवय झाली आहे. घरातून बाहेर येऊन मला खूप छान वाटलं, असं मी जेव्हा माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली की घरातून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ होती... माझा विश्वासच नाही बसत की मी सहा वेळा नॉमिनेट झाले? कारण माझ्याशी प्रत्येक जण चांगलंच वागत होता’ असं प्रत्युषानं बाहेर पडल्यानंतर म्हटलंय.
यावेळी प्रत्युषाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांच्या यादीत तनीषा मुखर्जी, गौहर खान, एजाज खान आणि काम्या पंजाबी यांचीही नावं होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
Bigg Boss 7: `Balika Vadhu` Pratyusha Banerjee eliminated