माझं कौमार्य शाबूत - सलमान खान, salman khan says i`m still virgin

माझं कौमार्य शाबूत - सलमान खान

माझं कौमार्य शाबूत - सलमान खान

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

‘कॉफी विथ करण’च्या धमाकेदार नवीन सीझनची सुरुवात झालीय. या शोमध्ये येण्याचा पहिला मान मिळाला तो अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना... या कार्यक्रमातही करणनं नेहमीप्रमाणेच काही खट्याळ प्रश्न सलमानला विचारले... आणि या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न करताना किंवा तसा विचार करताना सलमान दिसला... पण, नंतर मात्र नेहमीप्रमाणेच त्यानं या प्रश्नांची बेधडक उत्तरंही देऊन टाकली.

या शो दरम्यान सलमाननं, मी गर्लफ्रेंड किंवा लग्नाच्याबाबतीत काहीही बोलणं टाळतो, कारण मलाचा माहित नाही की माझं लग्न कधी होईल अशीही कबुली दिलीय. त्यानंतर करणनं जेव्हा सलमानला ‘कौमार्या’च्या बाबतीत (व्हर्जिनिटी) एक चिमटा काढला, तेव्हा गालातल्या गालात हसत सलमानं म्हटलं की, हो मी व्हर्जिनच आहे... आणि बोलता बोलताच सलमाननं हेही सांगून टाकलं की तो झोपताना एकटाच झोपतो... कारण त्याला एकटं झोपणं आवडतं... तर यावर करणनंही आपण उशीला कवटाळून झोपत असल्याचं सांगितलं.

‘सिनेसृष्टीत मी स्वत:ला ‘लो अॅव्हरेज’ अभिनेता मानतो’, असंही सलमाननं यावेळी कबूल केलंय. सलमान म्हणतो, शाहरुख खानचा रोमांटिक अंदाज, आमिर खानचं एखाद्या गोष्टीला वाहून घेण्याची वृत्ती आणि अक्षय कुमारच्या कॉमिक टायमिंगचा कुणीही हात धरू शकत नाही. सलमानच्या मते, शाहरुख खान, आमिर खान, ऋतिक रोशन आणि अक्षय कुमार हे जेवढी मेहनत आपल्या कामात घेतात, तेवढी मेहनत मात्र आपण घेत नसल्याचं म्हटलंय. ‘आत्ताच्या जमान्यात मी जर माझं करिअर सुरु केलं असंत, तर मला टीव्ही सीरियलमध्येही काम मिळालं नसतं’ असं सलमाननं म्हटलंय.

बॉलिवूडमधली सर्वांत आकर्षक आणि मेहनती अभिनेत्री कोण असं जेव्हा सलमानला विचारलं गेलं तेव्हा त्यानं झटकन दीपिका पादूकोणचं नाव घेतलं.इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 02, 2013, 12:46


comments powered by Disqus