आमिषाला बळी पडून `बिग बॉस`मध्ये केलं लग्न : सारा

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, February 7, 2013 - 16:58

www.24taas.com, मुंबई
रिअॅलिटी शो असा बोलबाला करणाऱ्या ‘बीग बॉस’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेल्या सारा खाननं तथाकथित ‘रिअॅलटी’चा बुरखा फाडलाय. सारा आणि अली मर्चंड यांचा विवाहसोहळा या कार्यक्रमातच पार पडला होता. हा विवाह हाही खरा नव्हता, आपल्याला ग्रॅन्ड फिनालेचं आमिष दाखवलं गेलं होतं आणि त्याचमुळे आपण नॅशनल टीव्हीवर विवाह केला, असा खुलासा सारा खान हिनं केलाय.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमात दाखवले जाणारे सर्वच सीन हे ‘रिअल’ नसतात... असं म्हणत सारानं आपल्या लग्नाचंच उदाहरण दिलंय. हे लग्नही खोटं असल्याचं तीनं म्हटलंय. ‘आमचं लग्न झालं तेव्हा माझे पालक तिथं उपस्थीत नव्हते मग कसलं लग्न.... एखाद्या रियालिटी शो दरम्यान झालेल लग्न खरं असेल हे कशावरुन?’ असं सारानं म्हटलंय. ‘लाईफ ओके’ या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘वेलकम-बाजी मेहमान-नवाजी की’ या रिअॅलिटी > शो दरम्यान मालिकेचा होस्ट अमन वर्मा याच्यासोबत सारा बोलत होती. ‘बिग बॉस दरम्यान झालेलं माझं आणि अलीचं लग्न मला आमिष दाखवून करण्यात आलं होतं... मी जर हा विवाह केला तर बिग बॉस च्या ग्रॅन्ड फिनालेत पोहचवू असं आश्वासन मला देण्यात आलं होतं’ असा खुलासा सारानं अमन वर्मासमोर केलाय.
सारानं नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर केलेला अली मर्चंट याच्यासोबत केलेला हाच विवाह आज तिच्यासाठी अडचणीचा ठरतोय. शोमधून बाहेर पडल्यावर सारा या लग्नाला विसरली पण अली हे समजूनच घेत नाही, त्यामुळे आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय, असंदेखील सारानं म्हटलंय. एका रिअॅलिटी शोदरम्यान अली अचानक तिच्यासमोर आला, तोही यापैकीच एक क्षण...

सारानं केलेल्या या खुलाशामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. ‘बिग बॉस’चा चौथा सिझन फिक्स होता का? कार्यक्रमादरम्यान झालेलं सारा आणि अलीचं लग्न प्रेक्षकांसाठीही एक नाटक होतं? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत.

First Published: Thursday, February 7, 2013 - 16:58
comments powered by Disqus