ऐकलंत का... ‘जान्हवी’ आणि ‘श्री’ खरोखरच लग्न करतायेत!

सध्या सर्वांच्या काळजात जी बसलीय ती म्हणजे झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी आणि श्रीची जोडी... आता ‘रील लाईफ’ मधली ही जोडी ‘रिअल लाईफ’मध्येही एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय.

| Updated: Nov 6, 2013, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या सर्वांच्या काळजात जी बसलीय ती म्हणजे झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतली जान्हवी आणि श्रीची जोडी... आता ‘रील लाईफ’ मधली ही जोडी ‘रिअल लाईफ’मध्येही एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय.
‘होणार सून मी या घरची’चे जान्हवी-श्री म्हणजेच तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर खरोखर `साता जन्माच्या गाठी` बांधण्याचा विचार करत आहेत. अजून याबद्दल कोणी स्पष्टपणे कबुली दिली नसली तर याला नाही पण म्हटलं नाहीय. सध्या सगळ्यांच्या घरात सून असावी तर ‘जान्हवी’ सारखी आणि जावई असावा तर ‘श्री’ सारखा असे स्वप्न रंगू लागले आहेत. दररोज न चुकता जवळपास सर्वच मराठी कुटुंबांमध्ये ही मालिका बघितली जाते.
शशांक आणि तेजश्रीलाही आता आपण एकमेकांसाठी योग्य असल्याचं वाटू लागल्याचं कळतंय. सेटवरच्या त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या या प्रेमाला दोघांच्या कुटुंबियांचाही पाठिंबा असल्याचं समजतंय. कारण ‘श्री-जान्हवी’च्या मालिकेतल्या लग्नालाही त्यांचे खरे पालक उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिवाय त्यांच्या साखरपुड्याबाबत बैठकीही होत असल्याचं कळतंय. याबाबत त्या दोघांना विचारलं असता त्यांनी मौन बाळगलंय, याचाच अर्थ हे खरं आहे. त्यामुळं आता या प्रेमाचं लग्नातही लवकरच रुपांतर होईल, अशी आशा आपण करुया आणि त्यांना शुभेच्छा देऊया!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.