टीम इंडियाच्या `गब्बर`ला नाचताना पाहायचंय...

`टीम इंडियाचा गब्बर` म्हणून ओळखला जाणारा शिखर धवनला चक्क नाचताना पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`टीम इंडियाचा गब्बर` म्हणून ओळखला जाणारा शिखर धवनला चक्क नाचताना पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. सेलिब्रिटी डान्स शो `झलक दिखला जा` या कार्यक्रमाच्या येत्या म्हणजेच सातव्या पर्वात जे सेलिब्रिटी दिसतील त्यामध्ये धवनचाही समावेश आहे.
येत्या दोन महिन्यांत हा कार्यक्रम लॉन्च केला जाणार आहे. परंतु, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही सेलिब्रिटींनी आत्तापासूनच यासाठी तयारी सुरू केलीय.
`झलक दिखला जा`मध्ये या पर्वात `कॉमेडी नाइट्स विथ कपिल`मध्ये पलकची भूमिका करणारा अभिनेता किकू शर्मा, सान्या ईरानी, `सपने सुहाने लड़कपन के`ची रुपल त्यागी, `ना बोले तुम`चा कुणाल करन कपूर, पूरब कोहली, रजनीश आणि व्ही जे अँन्डी हेदेखील या कार्यक्रमात दिसतील.
यासंबंधी किकूला विचारलं असता, `माझ्याकडे या कार्यक्रमाचा प्रस्ताव आलाय. परंतु आमचं अद्याप बोलणं सुरू आहे` असं किकूनं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी किकूनं कपल बेस्ड डान्स रिअॅलिटी शो `नच बलिए`मध्ये सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे जज असतील सिनेनिर्माता करण जोहर, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि कोरिओग्राफर दिग्दर्शक रेमो डिसूझा... `झलक दिखला जा`च्या गेल्या सत्रात म्हणजेच सहाव्या सीझनमध्ये दृष्टी धामीनं आपल्या डान्सनं सगळ्यांचं मन जिंकलं होतं. ती या पर्वाची विजेती ठरली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.