प्रियांका चोप्राचा विवाह `महादेवा`शी?

प्रियांका चोप्रासाठी वरसंशोधन तिच्या मावशीच्या दृष्टीने तरी संपलेले आहे. प्रियंकासाठी तिच्या मावशीने स्थळ पक्क केलं असून ‘देवों का देव महादेव’ मालिकेतील महादेवाची भूमिका साकारणाऱ्या मोहित रैनाशी प्रियांकाने लग्न करावं, अशी तिच्या मावशीची इच्छा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 7, 2013, 03:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
प्रियांका चोप्रासाठी वरसंशोधन तिच्या मावशीच्या दृष्टीने तरी संपलेले आहे. प्रियंकासाठी तिच्या मावशीने स्थळ पक्क केलं असून ‘देवों का देव महादेव’ मालिकेतील महादेवाची भूमिका साकारणाऱ्या मोहित रैनाशी प्रियांकाने लग्न करावं, अशी तिच्या मावशीची इच्छा आहे.
प्रियांकाच्या मावशीच्या मते प्रियांका चोप्रासाठी एका संस्कारी, प्रामाणिक आणि चांगला अभिनय करणारा नवरा मिळावा. मोहित रैनामध्ये प्रियांकाच्या मावशीला हे सर्व गुण आढळून आले आहेत. मालिकेमध्ये महादेव शिवशंकराची भूमिका साकारणाऱ्या मोहित रैनाचं फॅन फॉलोइंग अबालवृद्धांमध्ये चांगलंच वाढलं आहे. अनेक ठिकाणी लोक त्याला भेटून त्याच्या पाया पडतात. तो ही आपल्या या प्रतिमेचा फायदा घेत अनेक सामाजिक कार्यांसाठी हातभार लावतोय. अशा महादेव शंकराचं स्थळ प्रियांका चोप्रासाठी मावशीने नक्की केलं आहे.
मोहित रैनाला मात्र याबद्दल कसलीच कल्पना नाही. मात्र, प्रियांका चोप्राच्या नावासाठी केला गेलेला माझा विचार, ही मी माझ्या अभिनयाला दिलेली दाद समजतो, असं मोहित म्हणाला. प्रियांका चोप्रालाही मोहित रैना आवडतो का, हे मात्र अजून समजलेलं नाही.