श्रीलंका आऊट : द. आफ्रिका विजयी तर संगकारा निवृत्त

 श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याचवेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा हा शेवटचा सामना ठरला. आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.

Updated: Mar 18, 2015, 02:52 PM IST
श्रीलंका आऊट : द. आफ्रिका विजयी तर संगकारा निवृत्त title=

सिडनी : श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याचवेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा हा शेवटचा सामना ठरला. आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.

दक्षिण आफ्रिकेने १७ ओव्हरमध्ये श्रीलंकेने दिलेले १३४ रन्सचे टार्गेट पूर्ण केले. त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. श्रीलंकन खेळाडू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. 

धावफलकावर अवघ्या ३ रन्स लागल्या असतानाच आफ्रिकेच्या कायले अॅबॉटच्या गोलंदाजीवर सलामीवीर कुशल परेरा झेलबाद झाला. त्यानंतर तिलकरत्ने दिलशानलाही स्टेनने स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था २ बाद ४ अशी बिकट झाली आहे. आफ्रिकन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. श्रीलंकेचा संघ १३३ रन्सवरच ऑलआऊट झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.