टीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली

टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. 

Updated: Jun 22, 2015, 06:49 AM IST
टीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली title=

मिरपूर: टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. 

यापूर्वी बांगलादेशनं पहिल्या वन डेत भारताचा ७९ रन्सनी पराभव केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारतानं बांगलादेश दौऱ्यात वन डे सीरिज गमावण्याची ही पहिली वेळ आहे.

भारतानं पहिले बॅटिंग करत बांगलादेश समोर केवळ २०० रन्सचं आव्हान ठेवलं. अवघ्या ४५ ओव्हरमध्ये बांगलादेशच्या बॉलर्सनी टीम इंडियाचा गाशा गुंडाळला. त्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या टीमनं 
हे टार्गेट ३८ ओव्हरमध्येच पार केलं. 

पावसानं मॅचमध्ये व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर ४७ ओव्हरमध्ये २०० रन्स करण्याचं आव्हान होतं. ते पूर्ण करत बांगलादेशनं भारताला ६ विकेटनं हरवलं. 

बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला तो बॉलर मुस्ताफिजूर रेहमान. मिरपूरच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट्स घेऊन रेहमाननं वन डे पदार्पणात कमालीची कामगिरी बजावली होती. दुसऱ्या वन डेतही तोच भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्यानं ४३ रन्स देत सहा विकेट्स घेऊन बांगलादेशला दुसरीही वन डे जिंकून दिली. 

टीम इंडियाकडून विराट कोहली आणि धवनची ७४ रन्सची पार्टनरशीप वगळता कुणीही चांगलं खेळलं नाही. रोहित शर्मा शून्यावर आऊट झाला. तर पॉवर प्लेमध्ये भारतानं तीन विकेट गमावल्या. बांगलादेशकडून टेस्ट आणि आता वनडे सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियानं आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं क्रिकेट वर्तुळात बोललं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.