वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 8, 2016, 05:58 PM IST
वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत title=

मुंबई : वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.

१. ब्रँडन मॅक्युलम : न्यूझीलंडचा विस्फोटक बॅट्समन मॅक्युलमने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि अख्या क्रिकेट विश्वाला धक्का दिला. टी-२० वर्ल्डकप मधूनही मॅक्युलमने माघार घेतल्याने हा दिग्गज खेळाडू यंद खेळतांना दिसणार नाही..

२. केविन पीटरसन : इंग्लंडचा उत्कृष्ठ खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो पीटरसन चांगल्या फॉर्ममध्ये असून ही त्याला टी-२० टीममध्ये जागा मिळाली नाही. पीटरसन हा भारतीय मैदानांवर कमाल करू शकतो. त्याची निवड झाली असती तर इंग्लंडच्य़ा टीमला याचा नक्की फायदा झाला असता.

३. माइक हसी : ऑस्ट्रेलिया टीममधील आणखी एक मोठा खेळाडू ज्याची कमी ऑस्ट्रेलियन टीमला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सतावणार आहे. ओपनिंग कोण करणार यावरुन ऑस्ट्रेलियन टीममध्ये संभ्रम आहे. वॉटसन हा चांगला पर्याय आहे पण अंतिम १० मध्ये त्याचं नाव येणं जरा कठिणंच दिसतंय. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियनस हे माईक हसीला चांगलंच मिस करतील.

४. विरेंद्र सेहवाग : गेल्या वर्षी विरेंद्र सेहवागने संघात जागा मिळत नसल्याने क्रिकेटला अलविदा केलं. त्याचा खेळ अजूनही जबरदस्त आहे. दुबईमध्ये झालेल्या लीगमध्ये सेहवागने तुफान बँटींग केली आणि तो किती विस्फोटकपणे अजून ही खेळू शकतो हे दाखवून दिलं. भारताकडून सध्या रोहित शर्मा आणि धवन ओपनिंग करतो. धवन त्याची जागा जेव्हा धोक्यात येते तेव्हाच बँटींग करतो असं म्हटलं जातं त्यामुळे भारताला विस्फोटक ओपनिंग करुन देणाऱ्या सेहवागला आज ही क्रिकेट चाहते मीस करतात.

५. कुमार संगकारा : श्रीलंकेचा खेळाडू संगकारा याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं पण मास्टर चॅम्पियन लीगमध्ये केलेल्या बँटीगला पाहून त्याने सन्यास का घेतला हा प्रश्न उपस्थित होत असेल. सध्याची टीम ही कमजोर दिसतेय त्यामुळे संगकाराची कमी ही श्रीलंकेच्या खेळाडूंना नक्की जानवेल.