एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड एका गोड बातमीमुळे मोडणार...

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स लवकरच पिता होणार आहे. त्यामुळे ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातील कसोटी टीमचा भाग नसेल. त्यामुळं सलग १०० कसोटी सामने खेळण्याचा त्याचा रेकॉर्ड होऊ शकणार नाही. त्यानं सलग ९८ कसोटी सामने खेळले आहेत, मात्र बांगलादेशविरूद्ध खेळू न शकल्यानं त्याचा हा क्रम तुटणार आहे. 

Updated: May 28, 2015, 01:07 PM IST
एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड एका गोड बातमीमुळे मोडणार...  title=

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स लवकरच पिता होणार आहे. त्यामुळे ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातील कसोटी टीमचा भाग नसेल. त्यामुळं सलग १०० कसोटी सामने खेळण्याचा त्याचा रेकॉर्ड होऊ शकणार नाही. त्यानं सलग ९८ कसोटी सामने खेळले आहेत, मात्र बांगलादेशविरूद्ध खेळू न शकल्यानं त्याचा हा क्रम तुटणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलक्रिस्टनं सलग ९६ कसोटी सामने खेळले आहेत. एबी डिविलिअर्सची पत्नी डेनियल लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळं त्यानं कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. डिविलियर्सने १७ डिसेंबर २००४ला त्याचा पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो सलग खेळत होता. 

डिविलियर्सने ९८ कसोटी सामन्यात ५२.०९च्या सरासरीने ७६०६ धावा केल्या आहेत. त्यात २१ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. २७८ ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.