आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने रचला इतिहास

आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने इतिहास रचला. 

Updated: Feb 20, 2017, 03:06 PM IST
आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने रचला इतिहास title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने इतिहास रचला. 

आयपीएल स्पर्धेत निवड झालेला मोहम्मद नाबी हा पहिला अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू ठरलाय. अफगाणिस्तानच्या या क्रिकेटपटूची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. सनरायजर्स हैदराबादने याला ३० लाख रुपयांत खरेदी केलेय.

यंदाच्या हंगामात ३५२ क्रिकेटपटूंपैकी ५ क्रिकेटपटू हे अफगाणिस्तानचे होते. २००९मध्ये नाबीने वनडे करिअरची सुरुवात केली. त्याने आतापर्यंत ७२ वनडे सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केलेय. तसेच ५२ टी-२० सामने खेळलेत. नाबी एक चांगला ऑफ स्पिनरही आहे. आयसीसीच्या टी-२० आंतरराष्ट्रीय ऑलराउंडर्सच्या यादीत नाबी चौथ्या स्थानी आहे.