अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.

Updated: Mar 13, 2017, 09:30 PM IST
अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड  title=

ग्रेटर नोयडा : अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे. टी20 क्रिकेटमध्ये शहजादनं विराट कोहलीला मागे टाकलं आहे. शहजाद हा आता सर्वात जास्त टी20 रन असणारा चौथा बॅट्समन बनला आहे. 

मोहम्मद शहजादनं ५८ आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमध्ये १७७९ रन्स बनवल्या आहेत. कोहलीच्या ४८ मॅचमध्ये १७०९ रन्स आहेत. सर्वाधिक टी20 रन्स बनवणाऱ्यांच्या यादीमध्ये ब्रॅण्डन मॅक्कलम पहिल्या, तिलकरत्ने दिलशान दुसऱ्या आणि मार्टिन गप्टील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.