रिटायरमेंटनंतर आफ्रिदी काय करणार ?

ऑस्ट्रेलियानं पराभव केल्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Updated: Mar 25, 2016, 07:15 PM IST
रिटायरमेंटनंतर आफ्रिदी काय करणार ? title=

मोहाली: ऑस्ट्रेलियानं पराभव केल्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधलं पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ही मॅच आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली शेवटची मॅच होती असं बोललं जात आहे. या वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच तसे संकेत खुद्ध आफ्रिदीनंच दिले होते. 

पण रिटायरमेंटविषयी अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याची प्रतिक्रिया ही मॅच सुरु व्हायच्या आधी आफ्रिदीनं दिली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मी रिटायरमेंटविषयी घोषणा करीन, असं आफ्रिदी म्हणाला आहे. 

निवृत्त झाल्यानंतर आफ्रिदीच्या नव्या रोल विषयी झी 24 तासनं याआधीच बातमी दिली होती. आफ्रिदी कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये दिसू शकेल अशी बातमी झी 24 तासनं दिली होती. आणि आता कॉमेंटेटर हर्षा भोगलेनंही याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 

थोड्याच दिवसामध्ये तु आम्हाला कोट घालून वसिम अक्रमबरोबर दिसशील असं हर्षा भोगले आफ्रिदीला म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच संपल्यावर हर्षा भोगलेनं आफ्रिदीची मुलाखत घेतली तेव्हा, त्यानं हे वक्तव्य केलं.