टीम इंडियात 'ऑल इज नॉट वेल'

टीम इंडियात सध्या ऑल सोडा पण काहीच वेल नसल्याचच समोर येतंय. प्रत्येकपातळीवरुन टीम इंडियात सर्व सुरळीत असलेल्याचं सांगण्यात येत असलं तरी अशी परिस्थिती वेगळीच असल्याचं समजतंय.

Updated: Jun 24, 2015, 09:52 AM IST
टीम इंडियात 'ऑल इज नॉट वेल' title=

मुंबई : टीम इंडियात सध्या ऑल सोडा पण काहीच वेल नसल्याचच समोर येतंय. प्रत्येकपातळीवरुन टीम इंडियात सर्व सुरळीत असलेल्याचं सांगण्यात येत असलं तरी अशी परिस्थिती वेगळीच असल्याचं समजतंय.

कॅप्टन कूल धोनी आणि विराट कोहली या दोघांच्याही वैयक्तिक प्रशिक्षकांनी याचीच कबुली दिलीय. टीम इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवानंतर असं होणं सहाजिकच होतं. कारण बांग्लादेशनं टीम इंडियाला दोन्ही वनडेत धूळ चारली कारण या दोन्ही मॅचेसमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूला चांगली कामगिरी करता आली नाही आणि बांग्लादेशनं ३ मॅचची वनडे सीरिज पहिल्या दोन मॅचेसमध्येच खिशात घातली.

याविषयी एका चॅनलशी बोलताना धोनीचे कोच चंचल भट्टाचार्जी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन सध्या अस्वस्थ असून ड्रेसिंगरुम मधलं वातावरण हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही आणि त्यामुळेच त्याला आपल्या खेळीवर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याचं म्हटलय.

तर चंचल यांच्या या प्रतिक्रियेनंतर विराट कोहलीचे कोच राजकुमार शर्मा यांनीही एका दुसऱ्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. यात पराभवासाठी त्यांनी धोनीला कारणीभूत ठरवलं नसलं तरी 'दुसऱ्या वनडेतील पराभव हा टीम इंडियाच्या क्रिकेटसाठी काळा रविवार ठरलाय' अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

काहीही असलं तरी टीममध्ये सारं आलबेल नसल्याचं धोनीच्या वार्तणावरुन तरी स्पष्ट दिसतंय आणि त्याचा परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवरही स्पष्ट दिसून येतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.