मारला असा छक्का, कॉमेन्ट्री बॉक्सचा काच चकनाचूर

Last Updated: Tuesday, August 26, 2014 - 18:22
मारला असा छक्का, कॉमेन्ट्री बॉक्सचा काच चकनाचूर

हरारे: झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळविला. ऑस्ट्रिलियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या चांगलेच धुतले. त्यांचा १९८ धावांनी पराभव केला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल जॉनसनने असा छक्का मारला की बॉल सरळ कॉमेंड्री बॉक्सचा काचेला धडकला. 

बॉल लागल्याने काचेला तडा गेला आणि काचेचे काही तुकडे खाली पडले. जॉनसन या कारनाम्याने कॉमेंट्री करीत असलेल्या नील मांथोर्प आणि पॉमी म्बाग्वा यांना काही काळ काहीच कळाले नाही. म्बाग्वा याने आपल्या अंगावरी काचेचे तुकडे खाली झटकले आणि मांथोर्प याने अशा परिस्थितीत कॉमेंट्री सुरू ठेवली आणि प्रेक्षकांना याची माहिती दिली. 

शॉन पॉलकने ट्वीट करून लिहिले की, हरारेमध्ये मिचेल जॉनसनने कॉमेंट्री बॉक्समधून आमचा मॅच पाहण्याचा व्ह्यू खराब केला. तसेच त्याने तुटलेल्या काटेचा फोटोही पोस्ट केला आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

PTI
First Published: Tuesday, August 26, 2014 - 18:22
comments powered by Disqus