रायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!

आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 

Updated: May 25, 2015, 05:29 PM IST
रायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा! title=

मुंबई: आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 

अंबाती रायडूने १८व्या ओव्हरमध्ये मोहित शर्माच्या दुसऱ्या चेंडूवर एक सिक्स मारला. तो मारलेला शॉट इतका उत्कृष्ट होता की, डग आऊटमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरलाही उठुन टाळ्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखता आले नाही. सचिनकडून या शॉटला मनसोक्त दाद मिळाली म्हणजे तो शॉट कसा असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. रायडूने फटकेबाजी करत २४ चेंडूत ३६ धावा केल्या. 

कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये हा सामना खेळला गेला. चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.