कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला

क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते. 

Updated: Sep 23, 2016, 02:59 PM IST
कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला title=

कानपूर : क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते. 

कानपूरमध्ये कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा पुरस्कार सोहळा सुरु होता तेव्ही ही घटना घडलीये. ग्रीनपार्क स्टेडियममध्ये अनिल कुंबळे राज्यपाल राम नाईक यांच्याहातून पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले असताना एका व्यक्तीने त्यांचा मोबाईल, क्रेडिट कार्ड, पर्स तसेच चश्मा चोरला. कुंबळेंनी बीसीसीआयकडे याप्रकरणी तक्रार केलीये. 

कोच झाल्यानंतर दुसऱ्यांदा घडलीये ही घटना

टीम इंडियाचा कोच झाल्यानंतर सामान चोरीला जाण्याची ही घटना दुसऱ्यांदा घडलीये. याप्रकरणी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केलीये. 

विराट कोहलीबाबतही असे घडले होते

याआधी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबतही हे घडले होते. त्याचे महागातले कपडे कोणीतरी लंपास केले होते. त्याने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली होती.