बीसीसीआय अध्यक्ष पदाची माळ अनुराग ठाकूरांच्या गळ्यात?

 बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत बहुमताने मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  

Updated: May 21, 2016, 06:02 PM IST
बीसीसीआय अध्यक्ष पदाची माळ अनुराग ठाकूरांच्या गळ्यात? title=

मुंबई : बीसीसीआयची मुंबईत उद्या होणाऱ्या विशेष सर्वसाधारण बैठकीत बहुमताने मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे आधीचे अध्यक्ष शंशाक मनोहर नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

 

४१ वर्षीय अनुराग ठाकूर हे याआधी बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ठाकूर यांना पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि राष्ट्रीय क्रिकेट क्लबचा पाठिंबा मिळाला आहे. ते पडत्या काळात हे अध्यक्षपद स्विकारण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एम. लोढ़ा यांच्या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार फेरबदल करण्याचा दबाव बीसीसीआयवर आलाय.

शंशाक मनोहर सात महिन्यांपूर्वी बीसीसीआयाचे अध्यक्ष झाले होते. १२ मे रोजी शंशाक मनोहर यांना आईसीसीच्या चेअरमनपदी निवडण्यात आले. तसेच अनुराग ठाकूर यांची निवड झाल्यानंतर पुन्हा सचिव पदाची निवड होईल. ही निवड त्यांच्याच अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे.