'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'

लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.

Updated: Jan 2, 2017, 07:26 PM IST
'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा' title=

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनुराग ठाकूर यांनी टोलेबाजी केली आहे.

निवृत्त न्यायाधीश बीसीसीआयचं काम चांगल्या पद्धतीनं करणार असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. ट्विटरवर अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली ही लढाई माझी वैयक्तिक नव्हती तर सगळ्या क्रिकेट संघटनांची होती. राज्याच्या क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयमुळे भारतात क्रिकेटचा विकास झाला. इतर देशांच्या तुलनेत भारताकडे सर्वोत्तम खेळाडू आहेत असंही ठाकूर म्हणाले आहेत.

पाहा अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया