विराट-अनुष्काचा व्हॅलेंटाईन डेचा नवा सेल्फी होतोय व्हायरल

Last Updated: Friday, February 17, 2017 - 10:39
विराट-अनुष्काचा व्हॅलेंटाईन डेचा नवा सेल्फी होतोय व्हायरल

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी यंदाचा व्हॅलेंटाईन एकत्र साजरा केला. 

विराटने आपल्या इन्स्टाग्रामवरुन अनुष्कासोबतचा फोटोही शेअर केला होता. हा फोटो चांगलाचा चर्चेत राहिला. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक फोटो चर्चेत आलाय. हा फोटो विरुष्का_एडिक्ट’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय.

क्रिकेटच्या मैदानावर रेकॉर्ड करणारा कोहली प्रेमाच्या मैदानात मात्र अनुष्काच्या हाते क्लीन बोल्ड झालाय. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर कोहलीने आपल्या लेडी लव्हसोबत व्हॅलेंटाईन साजरा केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून विराट आणि अनुष्का रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी तर नव्या वर्षात दोघंही लग्न कऱणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र विराटने ट्विटरवरुन ते फेटाळून लावले. 

 

This day is damn lucky... One more pic of #virushka #viratanushka #

A post shared by virushka addict (@virushka_addict) on

 

First Published: Friday, February 17, 2017 - 10:37
comments powered by Disqus