अभिनव बिंद्राला आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण

 भारताचा ऑलिम्पिक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने आठव्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये, १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सूवर्णपदक पटकावलंय. 

Updated: Sep 27, 2015, 06:56 PM IST
अभिनव बिंद्राला आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण title=

नवी दिल्ली :  भारताचा ऑलिम्पिक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने आठव्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये, १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सूवर्णपदक पटकावलंय. 

अभिनवसोबतच गगन आणि चैन या दोघांनाही ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदकाची कमाई करणारा नेमबाज गगन नारंगने चौथा तर चैन सिंगने याच क्रीडाप्रकारात सहावा क्रमांक पटकावला आहे. 

अभिनवने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्येही १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं, सूवर्णपदक जिंकून बिंद्राने रिओ ऑलिम्पिकचं तिकीटही खिशात घातलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.