दक्षिण आफ्रिकेच्या बवुमाचा जबरदस्त रन आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बवुमानं केलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त रन आऊटची क्रिकेटच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Updated: Nov 6, 2016, 10:52 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या बवुमाचा जबरदस्त रन आऊट  title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बवुमानं केलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त रन आऊटची क्रिकेटच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही क्रिकेट रसिकांनी तर बवुमाची तुलना थेट जॉन्टी रोड्सशी केली आहे.

या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियासमोर 539 रनचं भलं मोठं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करातना डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श मैदानात उतरले. या दोघांमध्ये 50 रनची पार्टनरशिप झाल्यानंतर वॉर्नर एक रन काढायच्या नादात 35 रनवर असताना रन आऊट झाला.

पाहा बवुमाचा हवेतला थरारक रन आऊट

दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या चार आऊट 169 एवढा स्कोअर झाला आहे. शेवटच्या दिवशी त्यांना जिंकण्यासाठी आणखी 370 रनची आवश्यकता आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय मात्र सोपा दिसत आहे.