भुवनेश्वर कुमारनं किवींना लोळवलं

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी न्यूझीलंडच्या बॉलरना अक्षरश: लोळवलं आहे.

Updated: Oct 1, 2016, 08:30 PM IST
भुवनेश्वर कुमारनं किवींना लोळवलं  title=

कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी न्यूझीलंडच्या बॉलरना अक्षरश: लोळवलं आहे. दुसरा दिवस संपला तेव्हा न्यूझीलंडला 128 रनवर 7 विकेट एवढी मजल मारता आली. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंड अजूनही 188 रन पिछाडीवर आहे.

भारताकडून भुवनेश्वर कुमारनं 5 विकेट तर शमी आणि जडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली. याआधी दुसऱ्या दिवसाची 239 वर 7 अशी सुरुवात करणाऱ्या भारताचा डाव 316 रनवर संपुष्टात आला. वृद्धीमान सहाच्या नाबाद 54 रनमुळे भारताला 300 रनचा टप्पा ओलांडता आला.