... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!

 पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...

Updated: Mar 16, 2015, 10:34 AM IST
... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल! title=

मुंबई:  पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...

पाकिस्तानसाठी हा एक चांगला मौका आहे... ऑस्ट्रेलियाच्या होम पिचवर मॅच आहे... त्यांचा फॉर्मही चांगला आहे. पण क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळं जर ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर... क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान मॅचचा आनंद लुटता येऊ शकतो. 

वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात ६ वेळा मॅच झाल्या आहेत. प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानचा दारूण पराभव केलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही भारतानं पाकिस्तानला हरवलं. 

जर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर २६ मार्चला भारत-पाकिस्तान सेमीफायनल सर्व फॅन्ससाठी एक पर्वणी ठरू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.