IPLमध्ये कुणी घेतलं नाही, पुजारा निघाला काउंटी क्रिकेट खेळायला

 चेतेश्वर पुजारा क्रिकेटचा बाप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी यॉर्कशायरसोबत करार केलाय. या सत्राच्या सुरुवातीला काउंटी टीमकडून खेळेल. यॉर्कशायरनं पाकिस्तानच्या सीनिअर बॅट्समन युनुस खानला अखेरच्या क्षणी काढल्यामुळं पुजाराशी करार केलाय. मागील सिझनमध्ये डर्बीशायरसाठी खेळणाऱ्या पुजाराला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी मिळालीय.

Updated: Apr 2, 2015, 03:36 PM IST
IPLमध्ये कुणी घेतलं नाही, पुजारा निघाला काउंटी क्रिकेट खेळायला title=

नवी दिल्ली:  चेतेश्वर पुजारा क्रिकेटचा बाप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी यॉर्कशायरसोबत करार केलाय. या सत्राच्या सुरुवातीला काउंटी टीमकडून खेळेल. यॉर्कशायरनं पाकिस्तानच्या सीनिअर बॅट्समन युनुस खानला अखेरच्या क्षणी काढल्यामुळं पुजाराशी करार केलाय. मागील सिझनमध्ये डर्बीशायरसाठी खेळणाऱ्या पुजाराला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी मिळालीय.

चेतेश्वर पुजाराला कोणत्याही आयपीएल फ्रेंचायसीनं विकत घेतलं नाही आणि म्हणून तो काउंटी टीमकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध आहे. एका वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय पुजाराला भारतीय क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळाली. तेंडुलकर आणि युवराज सिंहनंतर पुजारा तिसरा भारतीय खेळाडू असेल जो यॉर्कशायरकडून खेळेल.

यॉर्कशायरचे क्रिकेट निदेशक मार्टिन माक्सन यांनी सांगितलं, 'अखेरच्या क्षणी युनुससोबतचा करार बाद करणं निराशाजनक आहे. मात्र पुजारा चांगला खेळाडू आहे ज्याला इंग्लंडच्या वातावरणाची माहिती आहे. तो राइट हॅन्डेड चांगला बॅट्समन आहे आणि क्रीजवर तग धरून राहणारा आहे. त्यामुळं आमच्या अभियानाच्या सुरुवातीला तो महत्त्वाचा खेळाडू ठरेल.'

आतापर्यंत २७ टेस्ट मॅचमध्ये ४७.११च्या सरासरीनं रन बनवणाऱ्या पुजाराही यॉर्कशायरकरून खेळण्यासाठी उत्साहित आहे. पुजारा म्हणतो, 'मी खूप उत्साही आहे आणि यॉर्कशायरसोबत करार करून स्वत:ला सन्मानित समजतोय. क्लबचा इतिहास खूप प्रभावी आहे.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.