सचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.

Updated: Feb 24, 2015, 10:31 PM IST
सचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन title=

कॅनबरा : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरामध्ये ख्रिस गेल नावाटं एक वादळ आलं. वादळात झिम्बाब्वेची गोलंदाजी पाचापाचोळ्यासारखी उडून गेली. गेलनं मौसम पकडला तर तो काय करू शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे त्याची ही खेळी. वर्ल्डकपच्या इतिहासातील त्यानं पहिल्यांदाच डबल सेंच्युरी झळकावली.

ख्रिस गलने १३८ बॉल्समध्ये ९ फोर्स आणि १६ सिक्सर्सच्या मदतीने ही रेकॉर्डब्रेक डबल सेंच्युरी झळकावली. १४७.४८ च्या स्ट्राईक रेटनं त्यानं झिम्बाव्वेच्या गोलंदाजांची पिसं काढली. ही डबल सेंच्युरी रचताना त्यानं अनेक रेक़र्डसना गवसणी घातली. वन-डेमधील ही फास्टेस्ट डबल सेंच्युरी ठरलीये. सेहवागचा १४० बॉल्सचा रेकॉर्ड गेलनं मागे टाकलाय. 

वन-डेमध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा तो पहिला अभारतीय क्रिकेटपटू ठरलाय. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहेवाग आणि रोहित शर्मा या तिघा भारतीयांच्याच नावावर हा विक्रम होता.  डबल सेंच्युरी झळकावणारा तो चौथा बॅट्समन ठरला असून वन-डेमधील ही पाचवी डबल सेंच्युरी ठरलीये. 

ही गेलची वन-डेमधील तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरलीये. रोहित शर्मा २६४ आणि सेहवागनं २१९ रन्स केल्या आहेत.  वन-डेमध्ये सर्वाधिक १६ सिक्स खेचण्याच्या रोहित आणि डविलियर्सच्या रेकॉर्डशी गेलनं बरोबरी साधलीय. 

भारताबाहेर पहिल्यांदाच वन-डेमध्ये डबल सेंच्युरी करण्याची किमयाही त्यानं केलीय. लास्ट बट नॉट लिस्ट. मार्लन सॅम्यूएल्ससमवेत वन-डेमधली सर्वोच्च पार्टनरशिप गेलनं रचली आहे. या दोघांनी ३७२ रन्सची खेळी करत सचिन-द्रविडचा ३३१ रन्सचा रेकॉर्ड मोडित काढलाय. 

 मुघलांच्या सैनिकांना पाण्यात शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब दिसायचं म्हणे. यापुढे झिम्बाव्वेच्या बॉलर्सना तसाच ख्रिस गेल दिसेल, यात शंका नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.