कॉमनवेल्थ : भारताची सात मेडलची कमाई, दोन गोल्ड

'ग्लासगो कॉमनवेल्थ'मध्ये भारताच्या अॅथलिस्टनं तब्बल सात मेडल्स मिळवत भारतीयांना सुखद धक्का दिलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे.   

Updated: Jul 25, 2014, 03:47 PM IST
 कॉमनवेल्थ : भारताची सात मेडलची कमाई, दोन गोल्ड  title=

ग्लासगो :  'ग्लासगो कॉमनवेल्थ'मध्ये भारताच्या अॅथलिस्टनं तब्बल सात मेडल्स मिळवत भारतीयांना सुखद धक्का दिलाय. यामध्ये, दोन गोल्ड, तीन सिल्व्हर तर दोन ब्राँझ पदकाचा समावेश आहे.   

वेटलिफ्टर संजिता चानू ही भारताची पहिली गोल्ड मेडलिस्ट ठरलीय तर तिच्या पाठोपाठ वेटलिफ्टर सुखेन देव यानंही गोल्ड पटकावत भारतीयांना सुखद धक्का दिलाय. 

वेटलिफ्टिंगमध्ये महिला गटात 48 किलो वजनीगटात संजिता चानूला गोल्ड तर भारताच्याच मीराबाई चानूला सिल्व्हर मेडल मिळालं. 20 वर्षीष संजितानं शानदार कामगिरी करत गोल्ड मेडलवर कब्जा केला. तर 19 वर्षीय मीराबाईनं सिल्व्हर मेडल मिळवलं. संजिताला 173 तर मीराबाईनं 170 पॉईंट्सची कमाई केली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मेडल्सची संधी होती. आणि वेटलिफ्टर्सनी अपेक्षित कामगिरी करत भारताला एकाच वजनीगटात दोन मेडल्स मिळवून दिलीत. 


 

48 किलो वजनी गटात ज्युडोमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले. भारताच्या खात्यात आणखी एक सिल्वर मेडल मिळाले. सुशीला लिख्माबामनं ज्युडोमध्ये भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे.

60 किलो वजनी गटात ज्युडोमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या खात्यात तीसरे सिल्वर मेडल जमा झाले. नवज्योत चानानं ज्युडोमध्ये हे पदक मिळविले.

52 किलो वजनी गटात ज्युडोमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे.  कल्पना थुडमला ब्राँझ पदक मिळाले. तर भारताच्याच गणेश माळीनंही ब्राँझ पदक पटकावलंय. त्यानं 244 किलोग्रॅम वजन उचलून ही कामगिरी केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.