डोळ्याला जखम झाल्याने किस्वेटर वर्ल्ड कपपासून दूर

इंग्लडला टी-२० विश्व चषक जिंकून देणारा विकेटकीपर फलंदाज किस्वेटर याला डोळ्याला दुखापत झाल्यामुळे २०१५ सीझनमध्ये क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर राहू शकतो. त्यामुळे त्याला विश्व चषकापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 11, 2014, 10:13 PM IST
 डोळ्याला जखम झाल्याने किस्वेटर वर्ल्ड कपपासून दूर title=

नवी दिल्ली : इंग्लडला टी-२० विश्व चषक जिंकून देणारा विकेटकीपर फलंदाज किस्वेटर याला डोळ्याला दुखापत झाल्यामुळे २०१५ सीझनमध्ये क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर राहू शकतो. त्यामुळे त्याला विश्व चषकापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. 

इतके नाही त्याचे संपूर्ण क्रिकेट करिअरही आता धोक्यात आले आहे. या वर्षी जुलैमध्ये काउंटी मॅच खेळताना एक चेंडून त्याच्या हेल्मेटला भेदून त्याच्या डोळ्याला लागला होता. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. 

समरसेट आणि नॉर्थहेम्पटनशायर दरम्यान झालेल्या सामन्यात नॉर्थहेम्पटनशायरचा गोलंदाज डेव्हिड व्हिले याने टाकलेल्या बाउंसरमुळे जबर जखमी झाला होता. या बाउंसरमुळे त्याचा डोळा, नाक आणि उजव्या गालाला जखमी झाली होती. क्रेग अजूनही वस्तूंना योग्य रित्या पाहू शकत नाही. 

क्रेगला २०१५ विश्व चषकातील इंग्लड टीमच्या संभावितांमध्ये जागा देण्यात आली आहे. पण त्याचा विश्व चषक खेळण्याची शक्यता फार धूसर आहे. 

क्रेग २०१३ पासून इंग्लडच्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. टीममध्ये विकेटकीपरची भूमिका निभावणार जॉस बटल संपूर्णपणे फीट झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.