आणखी एक बाऊन्सर... हेल्मेटच फुटलं!

ईडन गार्डनवर आणखी एक खेळाडू बाऊन्सरच्या धोक्यातून थोडक्यात वाचलाय. विश्व कपसाठी भारताच्या ३० संभावित खेळाडुंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी एका बाऊन्सरमधून वाचलाय.

Updated: Dec 18, 2014, 08:40 AM IST
आणखी एक बाऊन्सर... हेल्मेटच फुटलं! title=

कोलकाता : ईडन गार्डनवर आणखी एक खेळाडू बाऊन्सरच्या धोक्यातून थोडक्यात वाचलाय. विश्व कपसाठी भारताच्या ३० संभावित खेळाडुंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी एका बाऊन्सरमधून वाचलाय.

ईडन गार्डनवर कर्नाटक संघाच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट मॅचच्या शेवटच्या दिवसात अभिमन्यू मिथुन यानं एक धोकादायक बाऊन्सर टाकला... आणि सगळ्यांचे डोळे पांढरे पडले. बंगालची बॅटिंग सुरु असताना ३८ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला तिवारीनं मिथुनच्या बाऊन्सरवरून नजर हटवली... आणि हा बाऊन्सर बॉल सरळ जाऊन त्याच्या हेल्मेटला धडकला.

हा बाऊन्सर तिवारीच्या हेल्मेटवर इतक्या जोरात आदळला की त्यामुळे हेल्मेटला भेग पडलीय. यामुळे, कर्नाटकचे खेळाडू क्षणभर भांबावले. सगळ्यांनी धावत जाऊन तिवारीला सांभाळलं. दरम्यान बंगालचे फिजिओही मैदानावर येऊन धडकले. 

हेल्मेटवर निभावल्यामुळे तिवारी थोडक्यात बचावला... हेल्मेट फुटल्यानं त्याला नवं हेल्मेट परिधान करावं लागलं. 

या घटनेनंतर भांबावलेला तिवारी यानंतर फार काळ मैदानावर टिकू शकला नाही... आणि विनय कुमारच्या बॉलवर आऊट झाला. यानंतर त्याला सावधानता म्हणून 'एमआरआय'साठी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.