दिल्लीचा पंजाबवर 8 विकेट्सनं विजय

आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या सामन्यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तब्बल 8 विकेट्सनी विजय झाला आहे. 

Updated: Apr 15, 2016, 11:22 PM IST
दिल्लीचा पंजाबवर 8 विकेट्सनं विजय title=

दिल्ली: आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या सामन्यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तब्बल 8 विकेट्सनी विजय झाला आहे. 

दिल्लीनं जिंकला टॉस

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्लीच्या बॉलर्सनी योग्य ठरवला आणि किंग्स इलेव्हनला 20 ओव्हरमध्ये फक्त 111 रन बनवता आल्या. दिल्लीकडून अमित मिश्रानं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. 

डिकॉकची हाफ सेंच्युरी

112 रनचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची सुरुवातही खराब झाली. 3 रनवर श्रेयस अय्यर आऊट झाला. त्यानंतर मात्र क्वाटन डिकॉकनं संजू सॅमसनच्या मदतीनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं. डिकॉकनं 42 बॉलमध्ये 59 रन केल्या. 

दिल्लीनं उघडलं खातं

या विजयामुळे दिल्लीनं यंदाच्या मोसमातलं आपलं खातं उघडलं आहे. 2 मॅचनंतर आता दिल्लीकडे 2 पॉईंट्स आहेत. तर पंजाबचा मात्र हा सलग दुसरा पराभव आहे. त्यांच्या खात्यात अजून एकही पॉईंट आलेला नाही.